जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा सहा हजारांचा टप्पा पार, आतापर्यंत १५९ जणांचा बळी

20coronavirus_105_0
20coronavirus_105_0
Updated on

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी (ता.नऊ) जिल्ह्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येचा सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. सकाळी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात पुन्हा ७७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ३७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार हजार १९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान दोन कोरोनाबाधित रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत १५९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्याला कोरोनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हा कोरोनाचा वेढा कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापी म्हणावे तसेच यश यंत्रणेला आले नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून प्रत्येक दिवसाला शंभरीपार कोरोनाबाधितांची भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली जिल्ह्यात कारभार सुरू आहे.


दरम्यान बुधवारी (ता.नऊ) सकाळी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात ७७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल सहा हजार ३७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार हजार १९८ कोरोनाबाधित रूग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन कोरोनाबाधितांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने आतापर्यंत एकूण १५९ जणांचा बळी घेतला आहे. सध्या एक हजार ६८० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

दोन महिन्यांनंतरही हरभऱ्याचे पैसे नाहीत, शेतकऱ्यांचे थकले एक कोटी चाळीस लाख...

नागरिकांची गर्दी
कोरोनाचा कहर वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची भिती आता राहिली नसल्याचे चित्र आहे. कारण शहरातील बाजारपेठांसह सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सींगचा नियम हद्दापार झाले आहे. तर अनेक नागरिक विनामास्क बिनदास्त मार्केटमध्ये खरेदीसाठी फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अटोक्यात येण्याची लक्षणे सध्या तरी दिसत नाहीत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com